महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे तीन वर्ष इंग्रजी माध्यम कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता समिती आज भेट दिली.
त्या समितीचे अध्यक्ष,मा.डॉ.प्रशांत बोडके सर,मा.सहयोगी अधिष्ठाता (कृषी तंत्रज्ञान शिक्षण) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,
मा.डॉ.व्ही.बी.गेडाम सर, सहयोगी प्राध्यापक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर.
मा.डॉ. संतोष नेवरे प्राचार्य, शाहू कृषी तंत्र विद्यालय कोल्हापूर.
श्री.जी.ए.हरदे, समन्वयक (कृषी तंत्रज्ञान शिक्षण) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,
या समितीने कृषी तंत्रनिकेतन तीन वर्ष इंग्रजी माध्यम अभ्यासक्रम चालू करण्या संदर्भात वर्ग प्रयोगशाळा इमारत तसेच प्रक्षेत्र पाहणी विद्यालयाची शैक्षणिक व भौतिक सुविधा याबद्दल पाहणी केली. पाहाणी करून झाल्यावर त्यांनी आपल्या विद्यालयाबद्दल अभिप्राय व्यक्त केला.
प्रथम मा.डॉ.बोडके सर ...यांनी असे संबोधले की, विद्यालयाच्या मेन गेट व परिसर पाहूनच पूर्णपणे भारावून गेलो दतवाड असे खेड्या गावामध्ये एखादी शाळा ही एवढी विकसित नसेल अशी दृष्टी घेऊन आलो होतो पण विद्यालय प्रक्षेत्र परिसर विद्यालयाची इमारत वर्ग प्रयोगशाळा हे पाहून दृष्टिकोन बदलला विद्यापीठातील खाजगी कृषी तंत्र विद्यालयामधील सर्वात डेव्हलप झालेली जरी कुठली संस्था असेल तर ती फक्त आणि फक्त आपली आहे आणि आपले संस्थापक व पदाधिकारी हे देखील विद्यालयाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने पूर्णपणे कटिबद्ध आहेत. विद्यालयाच्या पुढील ध्येय धोरणासाठी व कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमांमध्ये सुधारित बदल करण्यासाठी आपल्या संस्थेच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे असा अभिप्राय मांडला. तसेच त्यांनी या डिप्लोमा कॉलेज बरोबरच बी.एससी ऍग्री कृषी महाविद्यालय याची मान्यता आपल्या विद्यालयाने घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली.
मा डॉ.गेडाम सर, यांनी विद्यालयाची शैक्षणिक व भौतिक सुविधा पाहून असे संबोधले की, एखाद्या व्यक्ती पहिल्यांदा पाहिल्यानंतर जसे प्रेमात पडतो तसेच माझे ही पहिली समिती सद्स्य म्हणून भेट व मी खरोखरच या विद्यालयाच्या प्रेमात पडलो आहे असे वाटते की इथे राहावे विद्यालयाचा परिसर व इमारत पाहून खरोखरच अविस्मरणीय क्षण व आजचा दिवस आहे.
त्यानंतर मा.डॉ.नेवरे सर यांनी देखील म्हणाले की, विद्यालयात वर्षातून चार ते पाच वेळेस भेट होते व प्रत्येक वेळेस या विद्यालयात नवनवीन उपक्रम नवनवीन प्रक्षेत्र लागवड व उत्पादन तंत्रज्ञान यामध्ये पूर्णपणे नावीन्यपूर्णरित्या काम केले जाते.
श्री हरदे यांनी देखील अभिप्राय व्यक्त केला की, विद्यालयाची शैक्षणिक भौतिक सुविधा ही चांगल्या दर्जाचे आहे त्यामुळे गेले तीन मूल्यांकन हे आपल्या विद्यालयास अ श्रेणी प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने आपली विद्यालयाची वाटचाल ही योग्य रीतीने आहे.
वरील सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मा.श्री चंद्रकांत पाटील व्हॉ.चेअरमन,सोसायटी सांगली यांच्या प्रस्तावनेतून झाले.
तसेच सत्कार शाळा समितीचे चेअरमन मा.श्री अरुण पाटील सर व शाळा समितीचे सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते झाली.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या समिती भेटी च्या अनुषंगाने वेळेचे भाण न ठेवता केलेल्या कामाबद्दल कामाबद्दल विद्यापीठ समितीने विशेष असे कौतुक केले आहे.